STORYMIRROR

Kalpana Nimbokar

Others

4  

Kalpana Nimbokar

Others

कोणत्या रंगात रंगू मी

कोणत्या रंगात रंगू मी

1 min
381

कोणत्या रंगात रंगू मी

तुझाच रंग माझ्या आवडीचा

रंगले तुझ्या प्रेमात सख्या

तूच साथीदार या जीवनाचा


रंगले इतके प्रेमरंगी

जाहले राधा मी तुझी

रंगपंचमीच्या रंगातली

प्रेमरंग ओळख तुझी


रंग सातही इंद्रधनुष्य

वाहीले तुझ्या चरणी

रंग एक तुझ्या विरहाचा

मी जाहले तुझी विरहीनी


जगण्या प्रेमरसाचे क्षण

सांग कोणता रंग मागु मी

तुच झेललेस आभाळ मनाचे

कोणत्या रंगात रंगू मी 


Rate this content
Log in