कोण होती माणसे ती
कोण होती माणसे ती
1 min
238
ओळखीची वाटणारी कोण होती माणसे ती
भावनांशी खेळणारी कोण होती माणसे ती
दोन घास पोट मागे भाकरीची आस होती
भाकरीला जाळणारी कोण होती माणसे ती
मायबापा काम नाही झोपण्याला बाज नाही
झोप रात्री चोरणारी कोण होती माणसे ती
शिक्षणाला दोन पैसे द्यावयाला आज नाही
खात पैसे शिकवणारी कोण होती माणसे ती
माणसांचा जन्म झाला दानवांची रीत झाली
माणसांना मारणारी कोण होती माणसे ती
