Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chaitrali Dhamankar

Others

3  

Chaitrali Dhamankar

Others

कोण आहे माझे

कोण आहे माझे

1 min
98


साथ सोडतात पाने देखील 

बहरलेल्या झाडांची 

साथ सोडतात फुले उमलती 

फुललेल्या वेलींची ||


नदी जाते सोडून मागे 

अस्तित्व आपले समुद्रामध्ये 

पक्षी देखील होतात सावज 

सोडून संगत जंगलामध्ये ||


ओलांडते लेक उंबरा माहेरचा 

रमते आपल्या संसारात 

नातवंडेही जातात दूर 

जीव लावून काळजात ||


एकच राहतो दोघांमध्ये 

दुसरा जातो सोडून प्राण 

श्वास ही देतो असाच धोका 

जातो सोडून हृदयातील स्थान ||


एकच आहे अर्थ साऱ्याचा 

कोणी नाही आपले इथे 

पाऊल टाकले जरी स्वर्गात 

कोण असेल माझे तिथे ||


Rate this content
Log in