STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

कोंडमारा

कोंडमारा

1 min
275

पहिली लेक झाली

सर्व आनंदाने खुलली.....


दुसरी लेक जन्मली

 तिच्या कलेत सारी रमली....


विचार केला तिसर्‍या खेपेचा

मुलगा होईल या विचाराचा....


दिवसामागून दिवस चालले

परत तिला दिवस राहिले....


नवरोबाने नऊ मास लाड केले

बायकोला खूपच खुशीत ठेवले....


वेळ आली बाळाच्या आगमनाची

बातमी मिळाली हो आनंदाची...,


परत एकदा लक्ष्मी जन्मा आली

नवरोबाची लाही लाही झाली....


रूसला जरा आता बायकोवर 

ताबा नाही राहिला हो मनावर.....


बायको आपली त्रासाने व्यापली

शस्त्रक्रियेने अती पिडीत झाली.....


नवरोबा का बरे काही विचाराने?

यात माझा दोष काय हे समजेना?.....


मुलगी दुसरे रूप आहे देवीचे

करूणा, माया अन ममतेचे....


मनाचा अती कोंडमारा होतोय 

नवरोबा आपला फुगून बसतोय.....


विचारातच जाईल काही वेळ

 नाही लागणार काहीच ताळमेळ....


जशी पोर होईल ना मोठी छान

तेव्हा दोन्ही घरचे दिवे लावेल महान...


Rate this content
Log in