कन्यादान
कन्यादान
1 min
621
हळद लागली
कांती उजळली
परी हो सजली
नवरी बनली
पिपाणी वाजली
नवरी लाजली
लाडाची ही लेक
हळदीत न्हाली
नव वधू सजे
ढोलताशा वाजे
पडता अक्षदा
स्वप्नात ती भिजे
नव आयुष्याची
मनी आशा दाटे
मायबाप दूर
काळीज ही तुटे
परक्याचे धन
सांभाळी माहेर
करी कन्यादान
नेत्री अश्रू पूर
काळीज तुकडा
होईल परका
काळजी बापाला
दाटला हुंदका
स्वतःचा तो अंश
दुजा हाती देता
हृदयात गोठते
माय रे ममता
निसर्गाची रीत
विवाह सोहळा
लेकीस निरोप
पानावतो डोळा
