कन्यादान..
कन्यादान..
1 min
345
घरात मुलगी जन्माला येते
जशी रोपावर सुंदर कळी एक उमलते..
घराला त्या घरपण येते
जसे कळी ने त्या रोपाचे सोंदर्यच खुलते..
वेळ येते तिला दुसऱ्याच्या स्वाधीन करायची
तेव्हा मात्र काळीज धडधडते..
आयुष्यात जोडीदार गरजेचा असतो असे तिला समजवायचे..
आणि आपल्या डोळ्यातले अश्रू मात्र लपवायचे..
कळीला त्या जीवापाड जपायचे..
आणि परक्याचे धन म्हणून
तिला दुसऱ्याच्या हाती सोपवायचे..
ह्यालाच *कन्यादान* म्हणायचे..!
