कन्यादान.
कन्यादान.
1 min
348
तुच माझी परी भाग्यवान
पोरी तूझ करतो कन्यादान....
माझं सोडून तू अंगण
सासरी करशील नंदन
वाढवशील माझा मनपान....
सुख मिळो तुला त्या दारी
नमस्कार करतील दिशा चारी
माझ्या प्रेमाच तुला हे आहे दान....
गरिबीचा होईल दुर अंधार
सुखात करशील तू संसार
माझी मुलगी आहेस.. तू माझा मान.....
जन्मभर ठेव बापाला अंतकरणी
सुख सार नादेल तुझ्याच चरणी
तूच माझ्या पोरी जिवाच आहेस रान....
