STORYMIRROR

Jyoti gosavi

Others

4  

Jyoti gosavi

Others

कन्या वस्तू नव्हेच दानाची

कन्या वस्तू नव्हेच दानाची

1 min
470

कन्या नव्हेच वस्तू दान करण्याची 

आहे ती जिती जागती हाडामासाची

आई बापाने दिले परक्याला आणि म्हणाले सुखी रहा

वागतील प्रेमाने का दमन करतील

तुम्ही तिच्या पाठीशी रहा

कन्यादान हे महापुण्य ही संकल्पना आता विसरा

स्त्रीशक्ती देखील आहे मोठी

उघडील ती डोळा तिसरा

पुरुष स्त्री ही दोन चाके संसाराच्या रथाची

वंशवेल वाढविते तुमची ठेवा भावना कृतार्थतेची

प्रेमाने वागवा, नका गाजवु वर्चस्व

 प्रेमाच्या दोन शब्दासाठी देईल तुम्हाला सर्वस्व


साहित्याला गुण द्या
लॉग इन