STORYMIRROR

VINAYAK PATIL

Others

3  

VINAYAK PATIL

Others

कमळ

कमळ

1 min
156

कमळ पहा फुलले

डुले कसे पाण्यावर

तळ्यात पाहता क्षणी

तरंगती मनावर ||१|| 


तळ्यात शोभे सौंदर्य

भुंगा फिरे सभोवती

सारा वेळ पिंगा घाली

शांत पाकळी बसती ||२|| 


हिरव्या पानाच्या देठी

कमळ दिसते छान 

कधी बाळगत नसे 

कशाचा दुराभिमान ||३|| 


रंगात असे भिन्नता

दिसते फार सुंदर 

मन मोहक रूपाने 

साऱ्याचा पडे विसर ||४|| 


वाहू त्याला पूजेसाठी

मान तयाचा वेगळा

गणपतीच्या पूजेस

असे आगळा वेगळा ||५|| 


Rate this content
Log in