STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

कळेना मज असे कसे झाले

कळेना मज असे कसे झाले

1 min
327

कळेना मज असे कसे झाले

  स्वप्न माझे अर्ध्यावरच संपले

तोंडातला घास माझ्या काढुनी घेतला

   अर्ध्यावरती डाव माझा अधूराच राहिला....


स्वप्न पाहिलं होतं मी ह्या सुखाचं

   ते पण भंग झालं आता

आधार मिळाला होता मला क्षणिक सुखाचा

   तो पण नियतीने ओढून घेतला

अर्ध्यावरती डाव माझा अधुराच राहिला....


ज्यांच्यावर माया केली मी फार

   तिचं माझ्यापासून दूर झाली

यशाकडे डोळे लाऊनी बसली

   तिथे पण हाती अपयश आले

अर्ध्यावरती डाव माझा अधुराच राहिला


साहित्याला गुण द्या
लॉग इन