STORYMIRROR

प्रतिभा बोबे

Others

3  

प्रतिभा बोबे

Others

खरंच तुम्ही हवे आहात

खरंच तुम्ही हवे आहात

1 min
362

किती सुरक्षित वाटतात ती घरे

ज्या घरात वृद्धांच्या आशिर्वादाचे वाहतात वारे


नाही वाटत घरी एकट्या असणाऱ्या

आपल्या काळजाच्या तुकड्यांची चिंता

कारण घरी असतो वरदहस्त त्यांच्यावर

जीवापाड प्रेम करणाऱ्या आजी- आजोबांची ममता


घरातील तरुण मुलंमुलीही करतात विचार

चुकीचे पाऊल उचलण्यापूर्वी

घरातील वृद्ध व्यक्तींची आठवून

पूर्वाश्रमीची स्वसामर्थ्याने मिळवलेली थोरवी


आज समाजाची जी आहे भीषण स्थिती

त्याला कारणीभूत आहे घरात वृद्धांची अनुपस्थिती

घरात वृद्धांचे अस्तित्व अडचण वाटू लागलंय

त्याचे दुष्परिणाम पहा समाजात दिसू लागलेत


म्हणूनच सारखे वाटत राहते

घरात आजी-आजोबा हवे आहेत

पुढची पिढी संस्कारक्षम घडवण्यासाठी

आपणही वृद्ध होणार आहोत हे लक्षात ठेऊन

त्यांना घरात मानाचे स्थान द्या आपल्या मानाच्या स्थानासाठी



Rate this content
Log in