Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Stifan Khawdiya

Others

4.5  

Stifan Khawdiya

Others

खरी गरज

खरी गरज

1 min
293


आता असं वाटतं काळाच चक्रे उलटी फिरावीत 

अन् छत्रपती शिवाजी महाराजांचे पावलं पुन्हा

मायभुमीच्या मातीत उमटावीत 

राजे आज खरी गरज आहे तुमच्या

प्रभावशाली विचांराची मायभुमीच्या हरएक नागरीकाला..

राजे आज खरी प्रेरणा हवी आहे तुमच्या

महान नेतृत्वाची, सत्तेसाठी हावरट झालेल्या प्रत्येक नेत्याला

राजे आज तुमच्या मार्गदर्शनाची गजर आहे

उसळणा-या रक्ताला योग्य दिशा दाखवून 

राष्ट्राच्या भल्यासाठी दुरदृष्टी ठेवायला 

राजे भ्रष्टाचार नांदत आहे मायभुमीत

आज कर्तुत्व नाही फक्त घात आहे

म्हणून लेकीबाळी आज असुरक्षित आहेत

राजे बळीची व्यथा फारच गंभीर आहे 

गळफासचा दोर त्याच्या दैवात आहे

इथ सारा कारभार अंधळा चालू आहे

राजे जेव्हा तुम्ही भगवा फडकवला तेव्हा तो 

समानतेचा भगवा होतो 

जात पात विसरुन तुम्ही माणसे माणसाला जोडली होती

अन् आज तोच भागवा जातीचा भगवा ठरतोय

राजे समानता तर दुरच पण जातीवादाच विष

मानवाच्या एकतेला हळु हळु संपवत आहे

राजे आज मायभूमीचा मावळा जातिभेदात 

फितुर झालाय

अन् तुमच्या ज्वलंत प्रेरणेला जातिवादाच्या चिखलात

दाबायचा प्रयत्न करत आहे

राजे दुर्दैव आहे मायभुमीचे मानवाचे जे छत्रपती शिवाजी राजे यांच्या सारख्या उर्जा शक्तीला अजान आहे

राजे तुम्ही मायभूमीतल्या प्रत्येकाचे आहात 

पण या जातिभेदात तुम्हाला पण काही नीच हलकट

षंढांनी जातीत तोलले आहे

राजे पदोपदी खंत वाटते या जातिभेदाची जिथं मानवतेला काळीमा फासला जातो आहे.

राजे तुमच्यासारखे पारदर्शी जीवन जगणा-या नेत्याची आज गरज आहे मायभुमीला 

इथं फक्त छत्रपती, महाराज,शिवाजी राजे,शिवबा, शिव, तुमच्या नावाचा जप आहे पण 

तुम्ही दिलेली शिकवण इथ सारेच विसरले आहेत.....


Rate this content
Log in