STORYMIRROR

Shreya Shelar

Others

4  

Shreya Shelar

Others

खंत

खंत

2 mins
358

आज मी तुझ्या आयुष्यात नाही किंवा... तू माझ्या आयुष्यात नाही.. पण 

जेव्हा मी दुसऱ्यांसोबत असते ते पाहून, थोडं तरी वाईट वाटतं ना?

चेहऱ्यावर आनंद, ओठांवर हास्य असलं तरी, डोळ्यात आसवं दाटतात ना?

खरं सांग ना.. 

आज मी तुझ्या आयुष्यात नाही किंवा... तू माझ्या आयुष्यात नाही याची खंत वाटते ना?

खूप कामं असतात तुला, अखंड कामात बुडालेला असतोस... पण 

याच कामामुळे कोणाला तरी गमावलंस याची जाणीव होतेच ना?

खरं सांग ना.. 

आज मी तुझ्या आयुष्यात नाही किंवा... तू माझ्या आयुष्यात नाही याची खंत वाटते ना?

एकेकाळी तुझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट माझ्याच आठवणीत जायचा... पण 

आज तो प्रत्येक दिवस एकांतात जगताना माझी आठवण येते ना?

खरं सांग ना.. 

आज मी तुझ्या आयुष्यात नाही किंवा... तू माझ्या आयुष्यात नाही याची खंत वाटते ना?

दिवसभरात बऱ्याच गोष्टी घडतात, एखादी माझ्याशी निगडित असेल, तर

भूतकाळात झालेल्या गोष्टी आठवून हसतोस ना?

नंतर काही काळासाठी का होईना पण, त्याच आठवणीत रममाण होतोस ना?

किती Funny होती यार ती, असे उद्गार येतात ना?

खरं सांग ना.. 

आज मी तुझ्या आयुष्यात नाही किंवा... तू माझ्या आयुष्यात नाही याची खंत वाटते ना?

रात्री झोपतानासुद्धा डोक्यात अनेक विचार असतात..त्यात मी ही असते ना?

असं का घडलं? काय करायला हवं होत? खरंच मीच कमी पडलो का?

असे कोडे सोडवत असतोस ना?

खरं सांग ना.. 

आज मी तुझ्या आयुष्यात नाही किंवा... तू माझ्या आयुष्यात नाही याची खंत वाटते ना?

असेल तुझ्या आयुष्यात आता दुसरं कोणी.. माझी जागा घेणारं.. पण 

खरंच तिने माझी जागा घेतली का? असा विचार करतोस ना?

"तू गेल्याने माझं काही नुकसान नाही झालं, मी खूप आनंदात आहे." 

असं म्हणत असशील तू कदाचित.. पण 

काही गोष्टीत तुला माझी कमी जाणवतेच ना?

खरं सांग ना.. 

आज मी तुझ्या आयुष्यात नाही किंवा... तू माझ्या आयुष्यात नाही याची खंत वाटते ना?

याची खंत वाटते ना?

Rate this content
Log in