खेड्यात माझ्या
खेड्यात माझ्या
नंदनवन हे आहे फुलले कसे खेड्यात माझ्या
खळखळणारे नदीचे गीत ऐक खेड्यात माझ्या
निसर्ग सुंदर देखावे हे कुणी काढले चित्रे
स्वप्न धुक्यातले धुंद कळ्यातले बघा खेड्यात माझ्या
उंच टेकडी जरा वाकडी आकाशा ही टेके
गार गार ही गवत फुलांची बाग खेड्यात माझ्या
झाडांची बघ ही आरास किती मनमोहक वाटे
हिरवे हिरवे रस्ते नटले छान खेड्यात माझ्या
वडाचे झाड किती पुराने कुणा खबरही नाही
सावलीत त्या वटवृक्षाच्या झोप खेड्यात माझ्या
लांब किनारा इथे पसरला लाटा वाहे वेगे
पर्यटनातील सुंदर ठिकाण असे खेड्यात माझ्या
क्षणोक्षणी ही माणूसकीत वाढत आहे नाती
तुकडोजींचे स्वप्न अवतरे जसे खेड्यात माझ्या
