STORYMIRROR

Kirti Borkar

Others

3  

Kirti Borkar

Others

खेडेगावचा निसर्ग

खेडेगावचा निसर्ग

1 min
191

खेडे गावचा नजारा

फुलतो जसा पिसारा

दुरून बघता गाव

दिसतो निसर्ग सारा..


गावाचा पहाट वारा

मंजुळ बासरी होते

गुज किलबिल पाखरे

दिवसाला जाग येते


सारवलेलं घर अंगण

गोठ्यात चरती गाई

चुल मांडून करते

स्वयंपाक माझी आई


प्रकाश किरणे पडती

झाडाच्या आडोशातून

पोरं हातावर घेती

सूर्याला घट्ट धरून


छोटे तलाव बाजूला

काठावर बसून घेते

पाण्यात पाय टाकू

मन मोकळे खेळते



साहित्याला गुण द्या
लॉग इन