कढण सोनेरी
कढण सोनेरी
1 min
266
आज खुललेल्या कळीने
सहज विचारले भ्रमराला..
कसं रे जमत तुला?
हळुवार फुंकर मारायला..
जाणवते तुझ्या फुंकरीची जादू
अन् हृदय लागते धडधडायला..
पाकळी मिटता मिटत नाही
जणू निद्रानाश जडलाय निशेला..!!
हसला भ्रमर म्हणाला,
तू देत आहेस खरी सारे श्रेय मला
पण मी आहे केवळ निमित्ताला
मी खुलतो तुझ्या सहवासात
सारे गुपित दडलेय त्यात
चल! आता मिटून घे पापण्या
हृदयावर ठेवून हात जरा
मी असेन तुझ्या आसपास
मग जाणवतील तुला
मिटल्या पापणीतील हे क्षण सोनेरी
तितकेच असतील खास..!!
