कचरा एक समस्या...!
कचरा एक समस्या...!
कचरा गाडी आली
कचरा गाडी आली
पापभिरूंची पहा
घाई झाली...
आता म्हणे
ओला सुका करा वेगळा
निव्वळ नुसता
वाटे गोंधळ सगळा....
अजुनी सरंजामी
थाट सम्पला नाही
अंगातल्या मस्तिचा सोस
वाटते संपला नाही...
खुर्चीतले महाशय
आदेश सोडतात
कचरा गाडी गाडीने
नको तिथे सहज टाकतात...
साहेबांचा साहेब
फोनवर बाजू घेऊन बोलतो
रखवालदारालाच चांगला
फासावर देतो....
पहा पहा गाडी आली गाडी आली
घरचा कचरा टाकायला
वाटते माजोरीनेच शहर
आपले घाण पुन्हा करायला...
तळे राखी तो पाणी चाखी
हे रे बाबा काही खोटे नाही
कुंपणच शेत खाते त्याला
इथे अजूनतरी कोणी वाली नाही....!
स्वच्छतेची ऐसी तैसी
यातच यांचा मोठे पणा
सामान्यांचा मात्र देशासाठी
झिजतो सदैव कणा....!
