STORYMIRROR

Devendra Ambekar

Others

3  

Devendra Ambekar

Others

★काय करावे काही कळेना★

★काय करावे काही कळेना★

1 min
478

काय करावे काही कळेना

काही केले तरी त्याचा

परिणाम काय झाला दिसेना

रोज रात्री उशिरा झोपणे

सकाळी उशिरा उठणे

काहीच लवकर होईना

काय करावे काही कळेना,


सगळं घर फिरून झालं

कोना कोपरा पाहून झालं तरी

मनाला थांग लागेल असा

कव्हरेज क्षेत्र काही भेटेना

घरात बसून करमेना

काय करावे काही कळेना,


चोर चिठयांपासून ते 

कॅरम, पत्यांच्या कॅट पर्यंत

मोबाईल पासून टीव्ही च्या

रिमोट पर्यंत सगळं हाताळून झालं

कशातच मन आता रमेना

काय करावे काही कळेना,


पुस्तक वाचायला बसलो की

झोपेचा किडा डोक्यात शिरतो

कविता लिहायचं म्हंटलं तर

शब्द संपावर गेल्यासारखं वाटतं

विचारांचा किडा काही जागा होईना

काय करावे काही कळेना,


पाहिलं लिहायला बसलो एक

आणि लिहलं मात्र दुसरंच

विषयांतर व्हायला लागलंय आता

डोकं चालेनासं झालंय आता

शेवटी मिच आराम देतो शब्दांना

काय करावे काही कळेना.......✍️

               



Rate this content
Log in