काव्यनाद
काव्यनाद
काव्यनादाची फुले वेचूनी,
गुंफली मी ती शब्दा मधूनी.
कधी ती नाचली मस्तानी होऊन,
कधी रुदाली होत,करे काळजाचे पाणी.
काव्यनाद जणू जीवलग सखा जसा.
माझ्या मनाचा प्रतिबिंब आरसा.
सुख दुःखाचा होऊन हिंदोळा.
दिव्यत्वाचा प्रचितीचा नाद तो खुळा.
काव्यनादाचा हा छंद आगळा,
देशास्फुर्तीसाठी जो तो लढला.
ह्दया ह्दयाच्या सूरात गुरफटला,
गीत रूपे अजरामर होऊन जगला.
काव्यनाद लावणीचा शृंगार,
पोवाड्यातो उस्फूर्त स्तुतिस्तोत्र शाहीर.
गजल मंत्रमुग्ध करणारी मोरपंखी झालर.
कधी ज्ञान गंगेचे नेत्रात झणझणीत जहर.
काव्यनाद नसता दुनियेत,
काय असते सिनेमाचे भाकित.
मनोरंजन ते मधूर भावपुर्ण संगीत.
हास्य खुलवित,राज्य दिर्घकाळ मनामनात.
काव्यनाद माणसशास्त्रीय आधार.
मलमपट्टीचा आपोआप संस्कार.
स्वर्गमय दुनियेचा सुंदर विस्तार.
जादुई छडीचा मनमोहक साक्षात्कार
