काव्यगगन
काव्यगगन
1 min
23.7K
काव्यगगनातून उतरे,
रंभा,उर्वशीच्या सौंदर्यात.
सप्तरंगात न्हाऊन निघे,
कस्तुरी सुगंध दरवळत.
काव्यगगनाच्या नभांगणी,
चमकती असंख्य तारे.
घालून बिलोरी साज शृंगारात,
स्वरसाधनेचे मंजूळ लहरी वारे.
काव्यांच्या अफाट सागऱ्यांच्या,
उफाळतात मनामनातन लाटा.
उंच भरारी घेत काव्यगगन,
छेदत शोधे दिव्यत्वाची असंख्य वाटा.
काव्यगगनाच्या कुशित,
सुख दुःखाची करत हितगुज.
अंगाई गात गोजारत मज,
ठेवी,वरदहस्त मस्तकी दररोज.
