STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

4  

Sanjana Kamat

Others

काव्यचकोर

काव्यचकोर

1 min
23.1K

काव्यचकोरांची चमकत लेखणी,

दिव्यत्वाची ज्योत पेटवित विश्वांगणी.

सजे भूत, भविष्य, वर्तमनाचे कोंदण,

मनामनात अजरामर प्रितीचे प्रांगण.


ध्येय ते,क्षितिजा पलीकडील पहावे,

बुध्दी सौंदर्यातून इंद्रधनुचे रंग सजावे.

सत्याच्या लेखणीतून सदा सळसळावे,

काव्यचकोर गीत अथांग सागरी वहावे.


समाजहिता परिसस्पर्शात परिमळत.

शब्दलहरीची तरंग नवरसात उधळत,

काव्यचकोर तारांगण जगी झळकवीत,

नाविन्यनिर्मितीची दिव्यदृष्टी प्रज्वलित.


वाचे,इतिहास,संत,ज्ञानकुंभी खजिना,

संस्कृती, आध्यात्मिकतेचा दागिना.

उज्ज्वल भविष्याचा शाश्वत कवडसा,

काव्यचकोर, प्रतिभावंतांचा आरसा.


काव्यचकोरास लाभे देवीचे वरदान,

निमिषाने घडे काव्यामृताचे गुंजन.

जीवन सार्थकी चढे सिंहावलोकन,

किर्ती रूपे उरण्याचे खुलले प्राक्तन.


Rate this content
Log in