काव्य
काव्य
1 min
247
सरसावणारे वेध, थवे खगांचे,
मनोरे दिसती,सुंदर कल्पनांचे.
बांंध फुटूनी वाहते नीर धरणाचे,
अवखळ आवली, कल्पीत प्रतिमांचेे.
स्फुरण पावती सहज, सुमन कळीचे,
दरवळे गंध चराचरी, शिंपण अत्तराचे.
मोहक रेखीव नक्षी,श्रृंगार आसमंताचे,
ओसंडे साज, फिटे पारणे लोचनांचे.
नैसर्गिक प्रसवे काव्य, डोहाळे नव विचारांचे,
कविता जनता तुष्टावे, मन मातेपरी कविचे.
