काटेरी झुडूप...!
काटेरी झुडूप...!
1 min
880
काटेरी झुडूप....!
माळरानी काटेरी झुडूप
हिरवगार दिसतं
त्याच कसं देव जाणे
वेगळं विश्व असतं....
किती उन्ह किती पाऊस
याला देणं घेणं नसतं
आपल्याच मस्तीत
याच जीण खुशहाल असतं...
खोल वर पाळंमुळं
रुजली की जीवन सोपं होतं
तेव्हा मात्र कोठे कोणाला
कोणावर अवलंबून रहावं लागतं...
या माळावरच्या झुडपाने
इतकं मात्र दाखवून दिलं
स्वावलंबी जीवनाचं
मोल चांगलंच पटवून दिलं...
स्वावलंबी जीवनात
कधी उन्हाळा पावसाळा नसतो
आनंदाचा सदाबहार
सौख्य समाधान शांतीचा
ताटवा फुलताच राहतो ....!
