कारण ते कवी असतात
कारण ते कवी असतात
1 min
232
तू सरळ बोलू नको
ते विपरीत समजतात
तू बर्फाला आग म्हण
पाण्याला धग म्हण
त्यांना त्याचेच अर्थ
नेमके कळतात
कारण ते कवी असतात..!!
तू उलटे चालत राहा
म्हणजे लागेल त्यांना धाप
वड्याचं वांग्यावर
अन् वांग्याचा वड्यावर
बसवून टाक चाप
तेव्हाच मानतील तुला बाप
त्यांना तसेच शब्द कळतात
कारण ते कवी असतात..!!
पण तरीही तुला
ते आपला मानणार नाहीत
तू दुर्लक्ष कर त्यांच्याकडे
अन् घालत राहा शब्दांना कोडे
उतर खोल खोल तळ्यात
अन् फुलव ज्वालामुखी हृदयात
तेव्हा तू रुजशील जनमाणसात
मग तेच करतील तुला आपलेसे
जरी ते नसले कवी
तरी खरे दर्दी तेच असतात..!!
