STORYMIRROR

Priyanka Shinde Jagtap

Others

3  

Priyanka Shinde Jagtap

Others

काळी माय

काळी माय

1 min
712





अष्टाक्षरी कविता


विषय:- काळी माय


आषाढाची पाठवणी

शुभारंभ चातुर्मासी,

कवितांचा वानवळा

अलंकारे अनुप्रासी ॥१॥


गगनात ओले घन

धडकले डोंगराला,

ताडताड थेंबांचा हा

पावसाळा बरसला ॥२॥


ऊन केशरी, पिवळे

रूप पाचूचे लेवून,

लपेटून सुख आले

सप्त रंगात नटून ॥३॥


शिवारात हिरवळ

काळी माय शृंगारली,

केवड्याचे स्मितहास्य

माळराने गंधाळली ॥४॥


झिम्मा, फुगडी घालत

श्रावणाची राज्ञी आली,

अभिषेक पावित्र्याचा

जत्रा उत्सवी भरली ॥५॥


शंकराच्या पिंडीवरी

कुंकू-हळदीचा वाण,

भावाप्रती प्रेम दावी

रक्षाबंधनाचा सण ॥६॥


हंडी फोडतो हा कान्हा

गोकुळाच्या अष्टमीला,

सोमवारी श्रावणाच्या

उपवास देऊ केला ॥७॥


खवळत्या सागराला

विनवणी शांततेची,

दर्यार्पण नारळाचे

दिनू आला पुनवेचा ॥८॥


भारतीय ऋतुशिल्प

पक्षी, तरु संजीवन,

हर्षोल्हास दाटे मनी

श्रावणाचे आगमन ॥९॥


©प्रियांका शिंदे जगताप, मुंबई

११/०५/२०१९


Rate this content
Log in