STORYMIRROR

आ. वि. कामिरे

Others

3  

आ. वि. कामिरे

Others

काही लोक

काही लोक

1 min
569

काही लोक हे अशीच असतात 

एखाद्या वा-यासारखे 

येतात व नुसता झटका देऊन जातात 

काही लोक हे अशीच असतात 

एखाद्या फुलपाखरासारखे

येतात व सर्वांना आनंद देतात 

जगातील लोकं ही अशीच असतात 

दुसऱ्याला कमी लेखण्यात ते स्वतःला आनंद देतात 

दुसऱ्याला आनंद देतात ते आयुष्याचा वाटेवर नेहमी आनंदी असतात 

आयुष्य हे असेच असते

 काही लोकासारखे

ते चांगले भेटले तर 

आयुष्य असते, नसेल 

तर जन्माला येऊनपण

 मरण असते 

काही लोक हे अशीच असतात 

स्वतःच्या गुणांचा 

घमंड त्यांना असतं

म्हणून दुसरा त्यापेक्षा

 हुशार हे त्यांना दिसत नसतं 

काही लोक हे अशीच असतात 

ज्यांच्या स्वतःकडे गुण असतात 

तरिही ते दुसऱ्याला

 कायम मदत करतात 

त्या आयुष्यासाठी 

कायम झटतात

काही लोक हे अशीच असतात 

या अशाच लोकासाठी जर 

कमी हुशार असेल काहीजण 

त्यासाठी यशस्वी होऊन दाखवायचे  

यात नाही कुठला पण

हो काही लोक अशीच असतात 

-------आदर्श वि.कामिरे


Rate this content
Log in