"जवान तुम्हा सलाम"
"जवान तुम्हा सलाम"
सैनिक हो तुम्ही महान
आम्ही करीतो तुम्हा सलाम ॥धृ॥
देशाची तुम्ही उंचवली मान
तुम्ही शुर हो बलवान
तुम्ही असे हो खुप कर्तृत्वान
तुमच्या शैर्याचा आम्हाला अभिमान ॥१॥
उन, वारा, पाऊस झेलत तु सिमेवर उभा
शञुसमोर कधी नाही लवत डोळा
बाळगत नाही तु कशाची तमा
तुझ्यामुळे आम्हाला लाभे समाधान ॥२॥
तिरंगा उॅंच फडकतो नभात
राष्ट्राचे हित असे तुझ्या मनात
तुझ्यामुळे होई राष्ट्र सामर्थवान
राष्ट्राचा नायक आमचा तु जवान ॥३॥
तुझ्या जीवनाचा खडतर असे प्रवास
आमच्यावर असे तुझे खुप उपकार
तुझ्यामुळे रे राष्ट्र हे घडणार
सैनिक हो माझा तुम्हाला प्रणाम ॥४॥
