जतन करण्याची गरज आहे..
जतन करण्याची गरज आहे..
1 min
203
जतन करण्याची गरज आहे..
कोवळ्या मनाला,
कणखर तनाला,
विरळत्या वनाला,
मौल्यवान धनाला !!
जतन करण्याची गरज आहे..
उडणाऱ्या पक्ष्यांना,
वाढणाऱ्या वृक्षांना,
मौल्यवान पशूंना,
निरागस शिशूंना !!
जतन करण्याची गरज आहे..
ऊबदार नात्याला,
छातीच्या भात्याला,
दानशूर दात्याला,
वयोवृद्ध तात्याला !!
जतन करण्याची गरज आहे..
गवताच्या पात्याला,
दगडाच्या जात्याला,
पुरातत्त्व खात्याला,
चरख्याच्या चात्याला !!
