ज्ञानबिंदू
ज्ञानबिंदू
1 min
374
मन मंदिरात माझ्या आईच असते
तिच्यासारखी दुसरी कोणीच नसते
साऱ्यांच्या भल्यासाठी झुरत बसते
स्वतःसाठी जगणे विसरून हसते
सदैव निस्वार्थतेचा वाहता झरा
पाहताच संगम स्नान होतो पुरा
शिकवला ज्ञानबिंदूचा श्रीगणेशा
विलक्षण सहनशक्तीचा पाझर खरा
हृदयात तिच्या सदा प्रेम बहरते
आवडीचा स्वयंपाक करण्यात व्यस्त असते
विधात्याच्या कृपेचे मिळाले वरदान
तिच्या संस्कारामुळे चालला संसार छान
थकलं शरीर तरी झिजतेय
चंदनाचा गंध देत दरवळतेय
लेकरांसाठी जीव मारत हसतेय
तिच्या ज्ञानबिंदूच्या स्त्रोतात मी मोहरतेय
