"जमिनीच्या तुकड्यासाठी "
"जमिनीच्या तुकड्यासाठी "
जमिनीच्या तुकडयासाठी
विसरतो माणुस नाती-गोती ॥धृ॥
आई-वडिलांशी भांडतो हा वाटणीसाठी
रक्तांची ती जीवाची ती
लढुनी भावंडाशी
जीवनभर तु होई वैरी ॥१॥
आयुष्यातील क्षण घालवितो मी पणासाठी
माणसा तु होऊ नको खुप लोभी
हक्क दाखवु नको दुसर्यांच्या पुंजीवरी
सुखी संसाराची त्यांने होई राख सारी ॥२॥
जीव घालवितो थोड्याशा हिस्स्यासाठी
स्वार्थीपणा तुझा रे जाणार नाही
तु काहीही घेऊन या जगात आला नाही
दोन घास मिळुनही तुझी हाव जात नाही ॥३॥
सात पिढ्यासाठी ठेवु नको साठवुनी
जग हे सोडोनी गेल्यावर कोणी विचारत नाही
येथे तुझे काही अस्तित्त्व राहात नाही
माणसा तु जाणार मातीत रे मिसळुनी ॥४॥
