Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rajan Jadhav

Others

4.2  

Rajan Jadhav

Others

जिव्हाळा

जिव्हाळा

1 min
182


भविष्याच्या शोधात , वर्तमानही माझा झाला व्यस्त 

क्षणभर विसावताना , भूतकाळही करतो मला त्रस्त ।।१।। 


का मी धावतो , क्षणभंगूर चैन सुखासाठी 

जोडत चाललो , कृत्रिम रेशीम अतूट गाठी ।।२।। 


स्वप्नांचे बंध बांधतो मी , करकचून घट्ट 

तेवढेच होतात सैल , पूँजी बनून लठ्ठ ।।३।। 


विसरत चाललो हव्यासापोटी , सारी नाती-गोती , 

जमवूनि पैसा सोन , तरीही शोधतो हिरे-मोती ।।४।। 


अगदी शितं टाकूनि , भूतं जमवित आलो 

शितांच्या भरोशावर , मलाच मी परका झालो ।।५।। 


महत्तकांक्षांच्या कैफाने , बेधुंद नशीला असा मी 

साठवतोय सर्वकाही , नशा होत नाही कमी ।।६।। 


भरकटलेला आज मी , हुडकतोय किंचित मनःशांती 

मायेच्या माणसांच्या सहवासात , मिळावी थोडी विश्रांती ।।७।। 


लाभावा तो पुन्हा , उन्हाळा अन् हिवाळा 

सगे-सोयरे नातलगांचा , हरवलेला तो जिव्हाळा ।। ८।। 


Rate this content
Log in