जीवनाचे मर्म
जीवनाचे मर्म
1 min
197
अंतकरणी ईश्वर भक्ती |
मिळण्या जिवनास मोक्षमुक्ती ||
करिती जन कर्माची विभक्ती |
पाप पुण्यात...||
जन्म- मृत्यू हे सत्य वचन |
कोणी सुटला ना या चक्रातून ||
जिवन म्हणजे जन्म- मृत्यूतील अंतर |
आनंदी जगावे निरंतर...||
चित्ती सदा करावे सत्कर्म |
हेची आहे जीवनाचे मर्म ||
त्यालागी करावा परमार्थ |
सकल जनांनी...||
जैसे कर्म तैसेची फळ |
ठावे असोनी जनां सकल ||
परी साधतात कोणी स्वार्थ |
चिंतूनी वाईट दुसऱ्यांचे...||