जीवन सार्थ
जीवन सार्थ
1 min
12K
जीवन सार्थकी लावण्याचे ध्येय ज्याचे,
आत्मविश्वासाने उडायचे हे विसरू नको.
किती ही वाहले बेईमान वारे.
विश्वासघात तु करू नको.
खोटेपणाचा मुखवटा लावून,
राजकारण तु खेळू नको.
मैत्रीचा हात देऊनी,
केसाने गळा कापू नको.
संघर्षाने लढताना हो,
पोटावर लाथ मारू नको.
माझाच नंबर पहिला असावा.
म्हणून पाय कुणाचा ओढू नको.
जीवन हे क्षणभंगूर आहे,
ह्याची जाणीव विसरू नको.
जीवन सार्थकी लावत असता,
किर्तीरूपे उरण्याची संधी सोडू नको.
विश्वासाने चमकतात असंख्य तारे.
काळजात बहार फुलविणे सोडू नका
विश्वासाने फुलतो गणगोत पसारा.
गोड संस्कार देण्यास विसरू नको.
