STORYMIRROR

VINAYAK PATIL

Others

3  

VINAYAK PATIL

Others

झरा

झरा

1 min
155

झुळझुळ झुळझुळ पाणी वाहे 

कधी कड्यावर कधी ओढ्यावर 

नाचत धावत कोसळत वाहे 

आनंद फुलवीत मिळे सागरावर 


ओढ विसावे समुद्राच्या कुशीत

खाऱ्या पाण्यात मिसळे गोडी अवीट 

दोघेही वसती प्रेमाच्या मिठीत 

सूर्य आग ओकत असे अत्यंत रागीट 


सृष्टी सारी तापताच होई लाही लाही 

पाण्याची वाफ होता उरे न बाकी काही 

वारा म्हणे थांब जरा तुला नेतो लांब 

भेटुनिया त्या रवी विचार त्याला जाब  


वरवर जाता शितल झाली हवा 

भरली हुडहुडी तिला न समजे जरा

कडकडून वीज वाफ धडकी डोंगरा 

चमत्कार बघा वाफ होऊन वाहे झरा 


झुळझुळ झऱ्याचे पाणी धावे सागरा

सागरा आले उधाण भेट घेई किनारा 

पुनर्मिलनाने झाली सृष्टी सदाबहार 

झरा झाला सागरमय स्वत्व देऊन बनला दिलदार 


Rate this content
Log in