झोपाळा.....
झोपाळा.....
1 min
42.6K
झोपाळा माझ्या
घरात सजला
सोनुला बाळ
त्यात निजला...
झोपाळा अंगणी
चिंचेच्या झाडाला
आईचा जीव
दोरीला टांगला...
बाळाचा झोपाळा
आईच्या साडीला
मायेची उब
आजीच्या गोधडीला...
खेळातला झोपाळा
मज्जाच मज्जा
करूनी दंगामस्ती
नको कुणी दुजा....
पंचमीचा झोपाळा
झेप घेई उंच आकाशी
लावता हात
येई राग नाकाशी...
परसातला झोपाळा
नाते निसर्गाशी
जडेल सर्वांचे
नाते प्रभुशी....
आठवणीचा झोपाळा
नसे त्यास दोर
अनुभवती सारे
बघा सारे लहानथोर....
