जगताना भान असावे
जगताना भान असावे
1 min
264
आयुष्य मनाप्रमाणे जगायचं
टेन्शन कशाचं का घ्यायचं ॥धृ॥
सुख-दुःख वाटून घ्यायचं
वाईट का बरं बोलायचं
वाईट नाही चिंतायचं
नाराज कोणावर का व्हायचं ॥१॥
मस्तीत पण शिस्तीत जगायचं
स्वतःशी प्रामाणिक राहायचं
जगासोबत चालायचं
कधीच नाही बरं खचायचं ॥२॥
नेहमी हसत रहायचं
जगाला आनंदी करायचं
पराभवातुन शिकुनी जिंकायचं
कधी नाही हार मानायचं ॥३॥
