जगण्याचे बळ
जगण्याचे बळ
1 min
33
विश्वंभर देतो
सर्वची जनास
*जगण्याचे बळ*
हेच हमखास
दिली आहे चोच
देतो तोची दाणा
कृपा आहे त्याची
उपकार जाणा
देती मायबाप
*जगण्यास बळ*
प्रेमळ छत्राचे
भविष्यात फळ
आधार मनाला
असतो तो खास
जगण्याचे बळ
एक मनी आस
जगण्याचे बळ
करण्या प्रगती
बळ आहे दिले
करावी उन्नती
मिळता प्रेरणा
अंगी येते बळ
स्पर्धेत सदैव
मिळतेच फळ
जगण्याचे बळ
दिधले देवाने
गेली महामारी
वाचलो सुखाने
