जगावे जरासे
जगावे जरासे
1 min
214
नदीच्या किनारी प्रियेला बघावे
हसावे जसारे स्वत:ला बघावे
फुलांना जपावे उन्हाने खुलावे
निराशेतही तू कळीला बघावे
उदासी नको ती नको रे खुलासे
सुवर्णा नको रे गुणाला बघावे
पराभूत झालास तेव्हा अजिंक्या
जरा हारलेल्या मनाला बघावे
हरावे स्वत:ही कधी जिंकतांना
कधी तोडतांना फुलाला बघावे
