जेष्ठ नागरिक...
जेष्ठ नागरिक...
1 min
416
आई वडिलांना आश्रमात सोडू नका
त्यांची आशा तुम्ही कधी मोडू नका....
केलं त्यांनी तुमच्यासाठी जिवाच रान
करा माता पित्याचा आदर तुम्ही सन्मान
आहेत तुमच्या ते आठवणी त्या झाडू नका...
म्हतारपणी कूठे हो ते एकटे राहतील
हा काळाचा वनवास कसा ते भोगतील
पोटभर जेवण द्या घासभर वाडु नका.....
आश्रमात जाऊन रोज किती रडतील
आपल्या मुलाविना ते एकटेच सडतील
हात जोडून सांगतो त्यांना कधी भांडू नका....
बायकोच प्रेम आज तुम्हाला दिसत
आई बाबांच प्रेम हे जन्माच सोन असत
मी हात जोडतो आई बाबांच मन तोडू नका....
