STORYMIRROR

Anil Chandak

Others

3  

Anil Chandak

Others

जडे अंधश्रध्देची उखडा

जडे अंधश्रध्देची उखडा

1 min
203

भिती लोकांना घालूनी, फेकती लिंबे टोचूनी!

भारुनिया टाकी मनी, काळी जादू करूनी!!


सापांनी चावले तरी, उपाय मांत्रीक करी!

नेती मरणाच्या दारी, घोर अज्ञानापरी!!


धनाची प्राप्ती होण्यांसी, बळी देत लेकरांसी!

अघोरी त्यां मांत्रीकांसी, शिक्षा द्यावी तयांसी!!


भोंदू साधु महामूर, धर्मश्रध्देचा व्यापार!

स्रियांवरी बलात्कार, लबाड झाले फार!!


जनां ग्रासिले लोभाने, व्हावे श्रीमंत धनाने!

भुरळीले मोहिनीने, लुटूनी नेती धने!!


सांगुनी तुकोबा गेले, समर्थांनी सांगीतले!

गाडगेबाबा बोलले, सर्वची वाया गेले!!


प्रबोधन ते करावे, मार्ग त्याती सापडावे!

अंधश्रध्देसी शोधावे, जडे ती उखडावे!!


धरा हाती विज्ञानांसी, निर्मुलन मंथनांसी!

घालवा अंधश्रध्देंसी, सुख द्यावे लोकांसी!!


Rate this content
Log in