STORYMIRROR

Rahul Sontakke

Others

3  

Rahul Sontakke

Others

जाती वेवस्था

जाती वेवस्था

1 min
342

पाण्याला कुठे असते जात 

दिव्यात सतत पेटत असते वात 

माणूस जातीत हरवलाय 

जात जात करून जीरलाय 


जातीचा जो तो बोलबाला करतो 

माणुसकी पुढे जातवाला हरतो 

जाती वेवस्थे वर तेढ निर्माण करणारे भेटतात 

जात मस्तकात ठेऊन एकमेकांशी भिडतात 


सर्व धर्म समभावाने नटलेला देश हा 

अन् शांतीच्या प्रतिका चा देश हा 

उघडे डोळे करून बघ 

एकोपाचा देश हा 


एक जात स्त्री- पुरुषाची 

एक धर्म माणुसकीचा 

अंत नाही सत्याला 

कोणतीही जात नाही झाडाच्या पत्याला 


एकोप्यात असतो स्वर्ग 

कठीण प्रसंगात सापडत असतो मार्ग 

ऊन जरा जास्त आहे 

जातीची येथे गस्त आहे 


नवचैतन्याचा आविष्कार होईल 

जो तो आनंदाचे गाणे गाइल 

फक्त जात डोक्यातून काढून पाहा 

दिसेल नवभारताचा नाविन्य दिवस हा 


Rate this content
Log in