इवलासा आधार
इवलासा आधार
इवलासा आधार तिने रस्ता जाताना केला,
पाहिले, नकोशी म्हणून बाळ कचऱ्यात टाकलेला.
जीव तुटला अन गळा दाटून आला,
काळजाचे पाणी झाले, पाहून बालिकेला.
बाळ अंध, मूक बहिरे होते कळले तेव्हा.
इतरांना ही इवलीशी ठिणगी होत आधार दिला.
शिकवले धडे, पायावर उभे त्यांस केले.
मान्यता प्राप्त शाळेचा पाया तिने रोवला.
मी शाळेवर खास शिक्षिका म्हणून गेले.
दंग झाले, पाहून साईन भाषेतील संभाषण.
अंध हात मेणबत्ती व मोत्यांच्या माळा बनवताना.
इवलासा आधाराने फेडू शकले मी समाजाचं देण.
ब्लॅक चित्रपटासाठी राणी मुखर्जी शाळेत आली.
अमिताभला साईन भाषा शिकवण्या मुले गेली.
हाॅस्टेल व शाळा इवलाश्या ठिणगीने उभी केली.
कित्येकांचे आशीर्वाद घेऊन जीवनी धन्य झाली.
