हवाईसुंदरी
हवाईसुंदरी
पाहूनी ती हवाई सूंदरी,चंचल मन करून गेली.
वाटले मना असावी अशीच सहचरणी.
रूप तिचे ते घायाळ मनमोहनारे,
नाजूक बांधा चमचम चमकणारी जणू चांदणी.
स्वप्नात मी हवाईसुंदरीच्या प्रेमात वाहत गेलो,
संसार पश्र्चिमात पध्दतीत करू लागलो.
मेकप,डिझाईनर कपडे,आवडतो हॅाटलचा छंद.
तिचा पगार स्वच्छंद उडविण्यात सदा बेधुंद.
पाश्र्चिमात व भारती संस्कृतीमुळे तुटला संसार.
स्वप्नातून जागत, बायकोच्या नावाचा केला गजर.
सात दिवस गणेशाचा सणास गावी ती गेली.
सातदिवस घराच्या कचऱ्यात तो पुरूषी अहंकार.
ती हवाईसुंदरी सुखी संसाराचे ज्ञान देऊन गेली.
मी अहंम भावना, संशयीवृतीचा केला उणाकार.
तिच्या खस्तांचा मी आठवला गुणाकार.
अन् भांडणाऱ्या क्षणाचा झाला शून्य भागाकार.
अशीच सुंदर आई असता मी ही सुंदर असतो,
शिवाजी महाराजांच्या ओळीची महती कळली.
आज मी बायकोला घेऊन विमानात बसलो.
तिच हवाईसुंदरी सर्वांच्या स्वागतात हसली.
