STORYMIRROR

Kirti Borkar

Others

4  

Kirti Borkar

Others

हरवलेले प्रेम

हरवलेले प्रेम

1 min
447

तुझ्यासाठी खूप 

लिहायचं असते

शब्द मात्र माझे

मुके झाले असते


मुक्या शब्दांना

बोल कधी फुटतील

तुझ्या समोर मला

शब्द मांडता येतील


भावनांना माझ्या

समोर कसे सांगू

तुझ्या समोर माझा

विषय कसा मांडू


प्रेमाची भाषा तुझी

मला बोलायची होती

वेळ निघून गेली

राहिले काही न हाती


सांगायचं होत मला

राहूनच गेलं सगळं

हिम्मत नाही केली

प्रेम गेलं हरवून सगळं


साहित्याला गुण द्या
लॉग इन