हरवलेले बालपण
हरवलेले बालपण
1 min
265
बालपणीचा गाव माझा
आजही शोधतो आहे
आठवणीच्या हरवलेल्या तुकड्यांना
पुन्हा जोडतो आहे....
हाकेसरशी साद देणारे
चेहरे शोधतो आहे,
बालपणीचा गाव माझा
आजही शोधतो आहे....
बधीर झाल्या भावनांना
संवेदना पेरतो आहे
घासामध्ये घास घेणारे
तुकड्यासाठी भांडतो आहे
बालपणीचा गाव माझा
आजही शोधतो आहे...
रक्ताळलेल्या पावलांनी मानवी
हुंकार एकतो आहे,
डोईवरील वात्सल्याचा स्पर्श
शोधतो आहे
बालपणीचा काळ माझा
आजही शोधतो आहे ....
