हरवलेला शिवबा
हरवलेला शिवबा
1 min
12.1K
शिवबा तू कुठेच दिसत नाही,
मायचा लेक बहिणीचा दादा कुठेच दिसत नाही,
अन्यायाविरुद्ध लढण्यात आज कोणीच दिसत नाही,
गरिबाला दाता नाही,
अनाथाला बाप नाही,
दुष्टासाठी लढण्यास आज कोणीच दिसत नाही...
शिवबा तू कुठेच दिसत नाही,
जिजाऊला बाळ नाही,
बहुजनाला क्रांतीसुर्य नाही,
तलवारीला धार नाही,
इज्जतीला मोल नाही,
रक्ताला धारच दिसत नाही...
शिवबा तू कुठेच दिसत नाही,
संस्काराला जान नाही,
मानवाला मशाल नाही,
नात्याला किनारा नाही,
प्रेमाला इथे वाव नाही,
आज पदरात दानच दिसत नाही...
शिवबा तू कुठेच दिसत नाही,
आज शिवबाची गर्जना नाही,
सह्याद्रीला खोरा नाही,
शिवबा आज खरंच,
शिवबा तू कुठेच दिसत नाही...
