हरून जिंकायचे आहे
हरून जिंकायचे आहे
प्रेमाच्या त्या वळणावर
मला सोडून जातांना
तू मागे वळून पाहलेस..
तेव्हा पासून आज पर्यंत
तुझी वाट पाहत आहे मी...
बहुतेक विसरलोही असतो
मी तुला
जर तू मागे वळून
पाहिले नसती तर...
तुला मागे फिरायचा होता
त्या वेळेला
आणि
मलाही पुढे येऊन
तुझा हात धरायचा होता...
पण
आपण दोघेही
संस्कारातून मिळवलेल्या
अहंकारापायी
हतबल झालो...
दोघेही हारून बसलो
जिंकण्याच्या जिद्दीत ...
एकामेकांना न रोखता
आपण जिंकणार
असा वाटत होता
आपल्याला...
होय जिंकलोच होतो
आपण दोघेही त्या वेळेला...
माहित नव्हता तेव्हा
आपला आजचा विजय
कायमचा हारावणार
आपल्याला...
मी आता विचार करतोय
हरण्याचा...
आता तू ही विचार कर
कमीत कमी
पुन्हा तुझ्या दारावर येऊन
तुला मी हाक मारली तर
जिंकण्याची जिद्द सोडून
हो म्हणण्याची तयारी कर...
जिंकून हरलेल्या आपल्याला
आता हरून जिंकायचे आहे... !
