STORYMIRROR

vaishali vartak

Others

2  

vaishali vartak

Others

होऊ कलावंत

होऊ कलावंत

1 min
40

एक कला तरी हवी

जीवनात अवगत

घ्यावी शिकून एखादी

व्हावे त्यात पारंगत


कला आहे महत्त्वाची 

 वाढवीते व्यक्तीमत्व

 देते मना विरंगुळा

चार लोकात प्रभुत्व 


चित्र, नाट्य अभिनय

खूप करावे लेखन

कला शिकावी एखादी

असो वादन गायन


कुठलीही कला देते

समाजात नाव मान

वाढे सहज ओळख

जगी मिळतो सन्मान


करी मोठे कलाकार 

मेहनत अतोनात

यश पडता पदरी

कलावंत जीवनात


जाणा महत्त्व कलेचे

करा स्वतःला यशस्वी 

मिळवण्या मोद खरा

मिळे आनंद मनस्वी


Rate this content
Log in