होरपळ
होरपळ
1 min
364
होरपळत आहे
आयुष्य आमचे
भुकेच्या आगीत,
आणि
आम्ही संघर्ष करीत आहोत
अन्नाचे दोन घास पोटात टाकून
जीवनाचा अस्थितव टिकवण्यासाठी,
आणि
धडपडत आहोत
आम्ही रात्रंदिवस
स्वासांचे इंधन म्हणजेच
चतकोर भाकरीच्या शोधात,
जी कधीच
धनिकांच्या तिजोरीत
बंद झालेली आहे
सोने नाण्यांचा रूपात...
