होळी
होळी
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
357
शिशिर ऋतुच्या परतीने
झाडांची पानगळी संपली
वसंताच्या आगमनाने
रंग घेऊन होळीआली ||
भागाप्रमाने नावे अनेक
होळी, शिमगा,कामदहन
नैवद्य पुरणपोळीचा
करती नारळ अर्पण ||
करूनी अपप्रवृत्तीचे
होळीमध्ये हो दहन
स्वागत चैत्रमासाचे
होलीकामातेचे पूजन ||
करू रंगाची उधळण
रंगांत जाती न्हाऊन
करती कृषी महोत्सव
साजरा होळी सण ||